प्राईम नेटवर्क : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी व्डिडिओ संदेशद्वारे उर्मट प्रतिक्रीया दिली होती. त्यावर जम्मू – काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री ‘मेहबुबा मुफ्ती’ यांनी ट्वीट करुन पाकिस्तानच्या पंतप्रधानांना एक संधी मिळणे गरजेचे आहे. पाक पंतप्रधानांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. खरतर सध्या निवडणूक आणि अन्य कोणत्याही विषयापेक्षा युद्धाचीच भाषा अधिक बोलली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
‘जर भारताने हल्ला केला तर पाकिस्तान पण शांत बसणार नाही. पाकिस्तान याच चोख प्रत्युत्तर देईल’, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली होती. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पाकिस्तान आता स्थिरतेच्या दिशेने जात आहे. भारताचे हे निवडणुकांचे वर्ष आहे. पाकिस्तानला दोषी ठरवून लोकांकडून मते घेणं खूप सोपे होईल, असाही दावा खान यांनी केला होता.
खान म्हणाले, की जेव्हा काश्मीरमध्ये कोणतीही घटना घडते तेव्हा भारत पाकिस्तानला दोषी ठरवतो. यासाठी वारंवार पाकिस्तानला बळीचा बकरा बनवण्यात येतो. अफगाणिस्तान प्रमाणेच काश्मीरचा मुद्दा ही चर्चेने सोडवता येईल. मुफ्ती यांनी खान यांची बाजू घेत हे ट्विट केले आहे.