Home राष्ट्रीय मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; बचावकार्य सुरू

मुसळधार पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; बचावकार्य सुरू

0

गेल्या तीन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच इडुक्की जिल्ह्यात राजमला परिसरात भूस्खलन झाल्याचे समोर आले आहे. सकाळच्या मीडिया न्यूजनुसार यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८० लोक अडकले आहेत. सुरक्षा दलाचे जवान तसेच एनडीआरएफ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत १० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

आज ७ ऑगस्ट ला सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे गावाला जोडणारा पूल वाहून गेला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी इंडियन एअर फोर्सकडे मदत मागितली असून एनडीआरएफ ची आणखी एक टीम लवकरच तिथे पोहचत असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

याशिवाय अग्निशमन दलाची ५० जणांची स्पेशल टास्क फोर्स राजमलाई येथून निघाली आहे असेही त्यांनी ट्विटमधून सांगितले.