Home राष्ट्रीय आजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू!

आजपासून लव्ह जिहाद विरोधातील कायदा उत्तर प्रदेशात लागू!

0

उत्तर प्रदेश सरकारने आज दिनांक २८ नोव्हेंबरपासून लव्ह जिहाद विरोधातील धर्मांतरं कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार मुलीचे केवळ लग्नासाठी धर्मांतरण केले गेले असल्यास ते लग्न अमान्य घोषित केले जाईल. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायद्याच्या अनुमोदनासाठीचा मसुदा पाठवला होता. त्यावर राज्यपालांनी आज स्वाक्षरी केली असल्याने आजपासून हा कायदा सक्रिय झाला आहे.

या कायद्यानुसार फसवून, खोटे बोलून किंवा धर्म लपवून, कारस्थान करून तसेच जबरदस्तीने धर्मांतरं करायला लावल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचा सरकारला अधिकार असणार आहे. याशिवाय धर्मांतरण करायला लावणाऱ्यांना व करणाऱ्यांना १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा सुनावली जाऊ शकते.