Home राष्ट्रीय Video : लादेन प्रमाणेच, मसूद अझर आणि हाफिज सईद याला ठोकणार, सरकार...

Video : लादेन प्रमाणेच, मसूद अझर आणि हाफिज सईद याला ठोकणार, सरकार कडून सूचक वक्तव्य

0

प्राईम नेटवर्क : अमेरिका जर लादेनला पाकिस्तानात जाऊन ठार मारू शकते तर आपण का नाही करू शकत, अशा प्रकारे मसूद अझर आणि हाफिज सईद याला भविष्यात सोडणार नसल्याचं सरकार कडून आणि केंद्रीय मंत्री अरुण जेठली यांनी दिल्ली येथील कार्यक्रमात सूचक वक्तव्य केलं आहे.

अरुण जेटली यांच्या या वक्तव्याला वक्तव्याला यावेळी महत्व दिल जात आहे, भारतावर हल्ला झाल्या नंतर, मोदी सरकार पाकिस्तानवर ठोक कारवाई करण्याच्या तयारीत आहे, या मुळे अरुण जेटली यांच्या वक्तव्याला मोठं महत्व आलं असल्याचं बोललं जात आहे.

बैठकीत मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदीचा निर्णय झाला आहे

पाकिस्तानच्या आजच्या आगळिकी नंतर पंतप्रधान मोदींनी तात्काळ केंद्रीय कॅबिनेट बैठक बोलावलीय, यावेळी सध्या पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर दबाव असल्याने, पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची आगळीक करू शकतो. पंतप्रधान मोदि यांनी बोलावलेल्या या बैठकीत मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदीचा निर्णय झाला आहे, त्यामुळे पाकिस्तानला हा मोठा इशारा असू शकतो

देश भरातील जवळपास सहा विमानतळे बंद केली

दरम्यान सकाळी पाकिस्तानी लढाऊ विमानाच्या घुसखोरी मुळे, सुरक्षेच्या कारणास्तव अमृतसर, पठाणकोट, चंदिगढ आणि इतर चार विमानतळे आणि उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत.