Home आरोग्य मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोना पॉसिटीव्ह; ट्विट करून दिली माहिती

मध्य प्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोना पॉसिटीव्ह; ट्विट करून दिली माहिती

0

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतांनाच दिसत आहे. बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. अशातच मध प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवराज चौहान यांनी स्वतः ट्विट करून आपण कोरोना पोसिटीव्ह असल्याची माहिती दिली.


ट्विट मध्ये ते म्हणाले, “माझ्या प्रिय प्रदेशवासीयांनो, मला कोविड-19 ची लक्षणं येत होती आणि टेस्ट केल्यानंतर माझा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना अपील करतो की जे माझ्या संपर्कात आले होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी आणि माझ्या जवळच्या संपर्कातल्या लोकांनी क्वारंटाईन मध्ये जावे.”

अशा प्रकारे संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याचे व क्वारंटाईन होण्याचे आव्हान शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. दरम्यान मध्य प्रदेशमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तेथील कोरोना बाधितांचा आकडा २५ हजारांच्या पार गेला असून जवळपास ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १७ हजारांहून अधिक लोक बरे होऊन घरी परतले आहेत. शिवराज सिंह चौहान हे देखील लवकरच उपचार घेऊन बरे होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.