Home राजकीय मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाहिला १.२५ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट…

मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाहिला १.२५ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा जन्मदिन आहे आणि त्यानिमित्त त्यांनी गुजरातला जाण्याचे योजिले आहे. तिथे नर्मदा नदीवर बनवण्यात येत असलेल्या सरदार सरोवराचा ते आढावा घेणार आहेत. त्यापूर्वी ते आपल्या आईचा आशीर्वाद घेतील. या सर्व वाढदिवसाच्या जय्यत तयारीत अरविंद सिंह नावाच्या एका वाराणसीच्या मोदी चाहत्याने अगदी धक्कादायक संपल्प पूर्ण केलं आहे, जो ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. सोमवारी बनारसच्या संकट मोचन हनुमान मंदिरात सदर व्यक्तीने सोन्याचा मुकुट चढवला आहे.

अधिक माहिती अशी की नरेंद्र मोदींचे चाहते अरविंद सिह यांनी मोदींच्या जन्मदिनानिमित्त वाराणसीच्या संकटमोचन मंदिरात १.२५ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट चढवला आहे. याबदल स्वतः अरविंद सांगतात की, ‘लोकसभा निवडणुकी आधी मी संकल्प केला होता की जर मोदींचं दुसऱ्यांदा सरकार आलं तर मी मारोती मंदिरात १.२५ किलो वजनाचा सोन्याचा मुकुट वाहीन.’ आणि आज त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला.