
प्राईम नेटवर्क : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्द्यानी केलेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. दहशतद्याच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणीही अनेकजण करत आहेत. अनेक दिग्गज लोकांनी आपल्या ट्वीटर अकाऊंट वर याबद्दल ट्विट करून संताप व्यक्त केला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्लाचा निषेध व्यक्त करताना, आता निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचे म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुबीयांच्या पाठिशी देश उभा आहे. तसेच, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असून राजनाथसिंह हे शुक्रवारी घटनास्थळाला भेट देणार आहेत.
अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काल सकाळपासून व्हेलेंटाईन डे चा जोश सुरू असलेला सोशल मीडिया क्षणार्धात भावूक झाला असून अवंतीपुरा हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करत आहे.