Home राष्ट्रीय कोरोनाच्या महामारीत मोहम्मद सैयुब आणि अमृत कुमार यांच्या मैत्रीची अचाट करणारी बातमी

कोरोनाच्या महामारीत मोहम्मद सैयुब आणि अमृत कुमार यांच्या मैत्रीची अचाट करणारी बातमी

0

सुरत येथून एका मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक मधून उत्तर प्रदेश मधील बस्ती या गावात जाणाऱ्या अमृत कुमारला आधीच अंगात ताप भरला होता, तो आणि त्याचा मित्र सैयुब(दोघांचे वय २३ वर्षे) एकाच गावचे असल्याने सोबत राहायचे पण जवळचे पैसे संपत आल्याने त्यांना दवाखान्यात सुद्धा जाता आले नाही, शेवटी कसेबसे ते गावाकडे जाण्यासाठी निघाले.

अमृत जवळ फक्त paracitamol च्या गोळ्या होत्या पण गर्मी आणि प्रचंड उन्हामुळे त्याची तब्येत अजून खराब होत चालली होती. ज्या वेळी हा ट्रक मध्य प्रदेश मधील कोलारस येथे पोचला त्यावेळी अमृत ची तब्येत प्रचंड खालावली. सैयुब ने जेव्हा त्याच्यासाठी डॉक्टर आणायला धाव घेतली ट्रक मधील सर्वांनी त्या दोघांना प्रचंड विरोध केला. शेवटी ट्रक चालकाने अमृत ला ट्रक मधून उतरवून दिले आणि सैयुब ला त्याची जागा घेऊन ट्रक मध्ये बसायला सांगितले त्यावेळी आपल्या मित्राला असे पाहून त्याने नकार देत मित्रासोबत राहायचे ठरवले.

रोडच्या शेजारी रुग्णवाहिकेची वाट पाहणारा सैयुब आणि अमृत चे फोटो सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल झाले. रुग्णवाहिकेमध्ये नेत असताना अमृत ने सैयुब शी बोलण्याचा प्रयन्त केला पण त्याचे तोकडे बोलणे हे शेवटचे ठरले आणि अमृत ने प्राण सोडले. मित्राच्या मृत्यूनंतर सैयुब ढसाढसा रडला. यानंतर अमृत ची कोरोना चाचणी करण्यात आली सैयुब शेवटी त्याचे रिपोर्ट घेण्यासाठी सरकारी इस्पितळात हजर होता.