Home राष्ट्रीय “रस्त्यावर उतरून सगळीकडे शिंका, विषाणू सगळीकडे पसरवा, हे जग बुडवूया” इन्फोसिसच्या मुजीब...

“रस्त्यावर उतरून सगळीकडे शिंका, विषाणू सगळीकडे पसरवा, हे जग बुडवूया” इन्फोसिसच्या मुजीब मोहम्मदचे वादग्रस्त पोस्ट, पोलिसांनी केली अटक

0

कोरोना व्हायरसचा प्रकोप जगभरात वाढत असून भारतात रुग्णांची संख्या ८०० च्या वर गेली आहे. मृतांचा आकडा सुद्धा २० च्या जवळ पोहोचला आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना काही समाजकंटक आपला वाईट मनसुबा दाखवत आहेत. नुकतीच एका उच्चशिक्षित मुस्लिम तरुणाने कोरोना व्हायरस बाबत एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यामुळे त्याला आपली नोकरी देखील गमवावी लागली आणि तुरुंगाची हवा देखील खावी लागली.

आयटी कंपनी इन्फोसिसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या ‘मुजीब मोहम्मद’ याने एक वादग्रस्त पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती. “चला सर्वांनी सोबत येऊ, लोकांमध्ये जाऊ शिंकूया, खोकूया आणि कोरोना पसरवूया”, अशी पोस्ट मुजीब मोहम्मद याने केली होती. एका उच्चशिक्षित, इंजिनिअर असणाऱ्या या तरुणाने अशी पोस्ट केल्याने खळबळ उडाली होती.या तरुणावर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात आली. यानंतर हा तरुण ‘इन्फोसिस’ या कंपनीत काम करत असल्याचे समोर आले. कंपनीने तात्काळ याची दखल घेत अशा विखारी विचारांच्या या तरुणाला नोकरीवरून काढून टाकले आहे. त्याबद्दल कंपनीने ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच सोशल मीडियावर कोरोना संक्रमण पसरवण्याबाबत लिखाण केल्याने त्याला पोलिसांनी सुद्धा अटक केली आहे.

आम्ही आमच्या एका कर्मचाऱ्याच्या सोशल पोस्टची पडताळणी केली आहे. कर्मचाऱ्याची पोस्ट “कंपनीचे नियम आणि सामाजिक जबाबदारीचे” उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे आम्ही “झिरो टॉलरन्स पॉलिसीनुसार” त्याला नोकरीवरून काढून टाकत आहोत असे इन्फोसिस ने सांगितले.