चार नराधमांनी डॉ. प्रियांका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली. आरोपींना गजाआड टाकण्यात आले असून सदर प्रकरणाने देशात खळबळ माजवणाली, अद्याप संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आणखी एक भर म्हणजे या प्रकरणातील आरोपींना तुरुंगात जेवणात मटन करी दिल्याचा धक्कादायक समोर आला आहे. परिणामी देशातील संतप्त जनसमुदाय या संताप व्यक्त करीत आहेत.
मीडिया रिपोर्ट नुसार हैदराबाद प्रकरणातील प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबादमधील चेरापल्लच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आले असून त्यांची पहिलीच रातरवतुरुंगात होती. आरोपींना दुपारच्या वेळी जेवणात डाळ-भात देण्यात आला व रात्रीच्यावेळी मटण करी आणि भात देण्यात आला. मिळालेल्या माहिती नुसार या चारही आरोपींवर पोलिसांची तुरुंगात नजर आहे संपूर्ण रात्र चारही आरोपी झोपलेले नाहीत असं सांगितलं जातं आहे.