Home राष्ट्रीय “नमाज घेता ते ठीक आहे, पण मशिदीवरचे भोंगे कशाला पाहिजेत?” : अलाहाबाद...

“नमाज घेता ते ठीक आहे, पण मशिदीवरचे भोंगे कशाला पाहिजेत?” : अलाहाबाद उच्च न्यायालय

0

अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी एका खटल्यात सूनवताना सांगितले की मशिदींमध्ये एकट्या माणसाने ‘अजान’ घेणे हे मान्य आहे पण कोव्हीड सारख्या संकटात लाऊडस्पीकर चा वापर करून ही अजान आणि नमाज पठण करणे हे अमान्य आहे.

न्यायमूर्ती शक्ती कांत गुप्ता आणि अजित कुमार यांनी सदर निर्णय घेतलेला असून ते अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ” मशिदी मध्ये नमाज आणि अजान घेणे हा इस्लाम चा महत्वाचा भाग असला तरी त्यासाठी लाऊडस्पीकर किंवा तत्सम अँप्लिफिकेशन वापरावे हे इस्लाम चा महत्वाचा भाग अजिबात नाही आहे.”

” अजान ही मशिदीच्या मिनाऱ्यात उभे राहून एखादा मनुष्य सुद्धा आरामात करू शकतो त्यासाठी लाऊडस्पीकर वापरण्याची आवश्यकता नाही, सविंधानामध्ये दिलेला धर्म आणि उपासना यांचे स्वातंत्र्य असल्याचा मूलभूत अधिकार (कलम २५) हा सुद्धा सामाजिक आरोग्य, शिस्त यांना बांधील आहे” असे यावेळी उच्च न्यायालयाने सांगितले.