Home राष्ट्रीय दहशतवाद्यांना कधी,कशी आणि कोणत्या प्रकारे शिक्षा द्यायची हे जवान ठरवतील – नरेंद्र...

दहशतवाद्यांना कधी,कशी आणि कोणत्या प्रकारे शिक्षा द्यायची हे जवान ठरवतील – नरेंद्र मोदी

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा कधी,कशी,केव्हा, कोण आणि कोणत्या प्रकारे दिली जाईल हे आमचे जवान ठरवतील असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना धैर्य तसंच आपल्या जवानांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.आज जर आपण स्वप्न पूर्ण करु शकत आहोत,विकास करत आहोत तर त्यामागे अनेकांचं बलिदान असल्याचं सांगत त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

दहशतवादी संघटनांनी जो गुन्हा केला आहे तो त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी शिक्षा दिली जाईल असा पुनरुच्चार नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. पुलवामा येथे जे काही झालं त्यावरुन तुमचा आक्रोश समजू शकतो. महाराष्ट्राच्या दोन जवानांनी देशसेवा करताना आपले प्राण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबाचं दुख: मी समजू शकतो. आपल्या सर्वांच्या भावना त्यांच्यासोबत आहेत. या शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

आम्ही सैनिकांवर गर्व आणि विश्वास करतो. सैनिकांमध्ये आणि खासकरुन सीआरपीएफमध्ये जो राग आहे तो देशाला समजत आहे असं सांगताना सैन्य दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी पुन्हा एकदा दिली. यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता टीका केली. एक असा देश जो फाळणीनंतर जन्माला आला, जिथे दहशतवादाला आश्रय दिला जातो आज दिवाळखोर होण्याचा मार्गावर आहे तो दहशतवादाचा दुसरा मार्ग झाला आहे अशी टीका नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता केली.