Home राष्ट्रीय हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींचं नवं CCTV फुटेज व्हायरल!

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींचं नवं CCTV फुटेज व्हायरल!

0

सबंध देशाला हदरवणारी आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना हैद्राबाद मध्ये घडली. डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या चार नराधमांना घटनेच्या अवघ्या काही तासात गजाआड टाकण्यात आलं होतं. चौकशी दरम्यान आरोपींना पुन्हा घटनास्थळी नेलं असता चारही आरोपी चकमकीत ठार झाले. या घटनेने केवळ हैद्राबाद नाही तर भारत देश पेटून उठला अनेक नारीकांनी हैद्राबाद पोलिसांचं कौतुक केलं तर राजकारणी पक्ष व नेत्यांकडून याची निंदा केली जात आहे अशातच या प्रकरणावर प्रकाश टाकणारा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

आरोपी पीडित तरुणीची हत्या करून याच ट्रक मधून तिचा मृतदेह घेऊन गेले असा दावा केला जात आहे. या टोलनाक्यावरील फुटेजमध्ये तुम्हाला एकीकडे भरधाव वेगात तरुणीचा मुतदेह घेऊन जाणार ट्रक दिसेल तर दुसरीकडे स्कुटी मार्गी लावण्यासाठी धडपडणारे आरोपी. सर्वप्रथम आरोपींनी तिची स्कुटी मार्गी लावली व नंतर मृत तरुणीचा मुतदेह जाळून टाकला. टोलनाक्यावरील याच cctv फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोलिसांना तातडीने पोहचता आलं असं म्हटलं जातं आहे. टोल नाक्यावरील हे नवं cctv फुटेज सोशल मिडीवर झपाट्याने व्हायरल होत आहे.