Home राष्ट्रीय आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर जीवघेणा हल्ला, तलवारीने हात कापला!

आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर जीवघेणा हल्ला, तलवारीने हात कापला!

0


कोरोना संकटसमयी देवदूत म्हणून उभे असलेले डॉक्टर्स आणि पोलीस यांना अभिवादन करणे सोडून उलट त्यांचे जीव घेणारे हल्ले होण्याच्या घटना अलीकडे देशात वाढीस लागल्या आहेत. कोरोनाचा अटकाव व्हावा म्हणून सक्तीचे लॉकडाउन देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात लागू केले आहे. या लॉकडाउनची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. येणाऱ्या प्रत्येक वाहन हे अत्यावश्यक सेवेसाठी आहे व चालकाकडे अत्यावश्यक सेवा परमिट आहे हे तपासून पहाणे हे पोलिसांचे काम.अशीच पास दाखव म्हणून विचारनि केली असता चालकाच्या साथीदाराने पोलिसांवर धारधार तलवारीने वार करत हात कापून टाकण्याची घटना काल घडली आहे.
पंजाब मधील पटियालामध्ये निहंगा जमात (ज्यांना परंपरेनं शस्त्र ठेवण्याची अनुमती असलेले निळा गणवेश परिधान करणारे) टोळक्यानं पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला.

निहंगांचा हा एक गट समूह पांढऱ्या रंगाच्या गाडीतून पटियालातील भाजी मंडईमध्ये जात होता. यावेळी लॉकडाउन असल्यामुळे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कर्फ्यू पास दाखवण्याची मागणी केली. मात्र, निहंगांच्या गटाने गाडी थेट भाजी मंडईच्या रस्त्यावर असलेले बॅरिकेट्स तोडत पुढे निघून गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यावेळी निहंगांच्या टोळक्यानं पोलिसांवरच हल्ला केला. या हल्ल्यात टोळक्यानं एका सहायक पोलिस निरीक्षकाचा तलवारीनं हातच कापला. तर दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्रासारखीच पंजाबमधील स्थिती कोरोनामुळे गंभीर झाली आहे. त्यामुळे तिथले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गर्दी थांबवण्यासाठी कायद्याची कडक भूमिका घेत अंमलबजावणी सुरू केली. मात्र, दुसरीकडं पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून कडक पावलं उचलली जात असताना पोलिसांवर हल्ले होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात पंजाबमध्ये घडलेली ही घटना अतिशय गंभीर आहे.