Home राष्ट्रीय निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी पुन्हा लाबंणीवर: ७ जानेवारीला होणार पुढची सुनावणी

निर्भया प्रकरणातल्या आरोपींची फाशी पुन्हा लाबंणीवर: ७ जानेवारीला होणार पुढची सुनावणी

0

दिल्लीतही सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण अर्थात निर्भया प्रकरणातल्या सर्वच आरोपींची फाशी आणखीनच लाबंणीवर पडली आहे. दयेसाठी केलेल्या आरोपींच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या त्यामुळे फाशी होणार हे सुप्रीम कोर्टाकडून तरी निश्चित होतं. त्यामुळे या सुनावणीत आरोपींना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पुन्हा एकदा कोर्टाची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, “प्रकरणातल्या सर्व आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा दिली जावी” अशी मागणी निर्भयाच्या आईने कोर्टात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली असून कोर्टाने म्हटलंय की आरोपींनी राष्ट्रपतींकडे दयेच्या याचिका दाखल केलेल्या आहेत. त्या सर्व याचिका फेटाळल्या गेल्यानंतरच डेथ वॉरंट काढता येतं. त्यामुळे सध्यातरी शिक्षा लांबणीवर पडत आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ७ जानेवारीला होणार असून कोर्टाचा निकाल ऐकून निर्भयाच्या आईला अश्रू अनावर झाले.