Home राष्ट्रीय आज रात्री बारा वाजेपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही

आज रात्री बारा वाजेपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही

0

जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजेच २२ मार्चला देशातील ३७०० रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं असून टाइम्स ऑफ इंडियानं या बातमीला पुष्टी दिली आहे.शनिवारी रात्री १२ वाजेपासून रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.तर आधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.२१ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही आहे. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा ट्रेन आपल्या निर्धारित स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार २२ मार्च रोजी २२ तासांसाठी कोणतीही ट्रेन आपल्या सुरूवातीच्या स्थानकापासून रवाना होणार नाही.


जगातील दुसरं सगळ्यात मोठं रेल्वे जाळं असलेल्या भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवेवर परिणाम होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांनी स्वत: कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं असताना रेल्वेनं एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द केल्यानं नजीकच्या काळात लॉकडाऊन करावे लागले तर त्याची ही चाचपणी तर नाही ना, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.