
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमीपूजनाचा सोहळा पार पडला. पुढील तीन वर्षांमध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण पण होईल असे मंदिराचे रचनाकार यांनी सांगितलं. हे सगळं चालू असताना ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांनी चिथावणी देणारे वाक्य बोलले आहे.
ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजीद रशीदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मशीद ही कायम मशीदच असते तिथे कुठलंही मंदिर बांधलं तरी तिथे मशिद च असेल असं इस्लाम सांगते अस ते बोलले.
ते बोलले की राम मंदिर काढून इथे मशीद बांधल्या गेलेलं नाही. तर , आता इथे मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडल्या जाऊ शकतं.असं चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केलं.तसेच राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याला येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचा अपमान केल्याचेही मत मौलानांनी मांडले.
त्यातच एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिर भूमिपूजनानंतर यावर नाराजी व्यक्त केलीये.