Home राजकीय मध्यप्रदेश मध्ये ‘ऑपरेशन लोटस’, २५ कोटींमध्ये ८ आमदारांची झाली डील!

मध्यप्रदेश मध्ये ‘ऑपरेशन लोटस’, २५ कोटींमध्ये ८ आमदारांची झाली डील!

0

मध्यप्रदेशातील कामलनाथ सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंघ यांनी केला आहे. भाजपने सत्ताधारी पक्षाच्या ८ आमदारांना हॉटेल मध्ये कोंडून ठेवले असल्याची व त्यांना २५-३५ कोटींची ऑफर देण्यात येत असल्याची बातमी चर्चेत आहे. 

काँग्रेसचे ४ आमदार तर मित्रपक्षाचे ४ आमदार असे ८ जण या कथित होटेल मध्ये बळजबरीने डांबून ठेवले असून. New Indian Express या वृत्तपत्राने यासंबंधी बातमीवर प्रकाश टाकला आहे. मध्यप्रदेशचे अर्थमंत्री तरुण भनोट यांनी डांबून ठेवलेल्या आमदारापैकी माजी मंत्री बीसाऊलाल सिंह यांचा फोन आल्याचे सांगितले तसेच या ८ आमदारांना भेटण्यासाठी म्हणून  मध्य प्रदेश च्या मंत्रिमंडळातील मंत्री गेले असता त्यांना त्या हॉटेल मध्ये प्रवेश नाकारला असा आरोप सुद्धा भनोट यांनी केला. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह भाजप नेते ‘ऑपरेशन लोटस’मध्ये गुंतल्याचा दावा काँग्रेस कडून होत आहे.


मध्यप्रदेश विधानसभेत २२८ सदस्य संख्या असून ११४ आमदार काँग्रेस चे आहेत तर २ बसपा १ सपा  आणि ४ अपक्ष असा ८ आमदारांचा पाठिंबा आहे. भाजप कडे १०७ आमदारांचा ताफा असून त्यांना ८ आमदार मिळाल्यास सत्तापालट होऊ शकतो!