Home राष्ट्रीय पाकिस्तान घाबरला, आम्हाला युद्ध नको, शांती हवीये, पाकिस्तानचा भारतापुढे प्रस्ताव

पाकिस्तान घाबरला, आम्हाला युद्ध नको, शांती हवीये, पाकिस्तानचा भारतापुढे प्रस्ताव

0

प्राईम नेटवर्क : भारताने काल पाकिस्तानला घरात घुसून मारल्यावर, पाकिस्तानने आज सकाळी भारतावर हवाई घुसखोरी करत पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने जवळपास भारताच्या ३ किलोमीटर आत हद्दीमध्ये आली होती. या तीन पैकी पाकिस्तानच्या एफ १६ हे लढाऊ विमान भारताने यशस्वी रित्या पाडलं आहे, भारत पाकिस्तान मधील पार्श्वभूमीवरील तणाव पूर्ण संबन्ध ताणल्या मुळे कंगाल पाकिस्तान घाबरला आहे, पाकिस्तानने भारतापुढे नवीन प्रस्ताव ठेवत आम्हाला युद्ध नको शांती हवी आहे, असं या प्रस्तावात म्हटलं आहे.

मोदी सरकार पाकिस्तानला सध्या माफ करण्याच्या मूड नाहीये

पुलवामा हल्ल्या नंतर मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या नंतर पाकिस्तानला पहिल्यांदाच हि अक्कल आली आहे, पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने घेतलेले निर्णय भारताच्या पथ्यावर पडत आहेत. मोदी सरकार पाकिस्तानला सध्या माफ करण्याच्या मूड दिसत नाहीये.

पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे

यावेळी पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे, अमेरिकेने पाकिस्तानला देऊ केलेली मदत अचानक नाकारल्याने, पाकिस्तानला सध्या चीन आणि आयएमएफ अशा संस्थांकडे भिकेचा कटोरा नेण्या शिवाय पर्याय उरला नाहीये, त्यात अजून जागतिक बँकेने पाकिस्तानवर कर्जा संबंधी काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सध्या आर्थिक विवंचनेत असताना पाकिस्तानला युद्ध करणं, म्हणजे त्यांच्या कडे आहे तो पाकिस्तान गमावण्या सारखं आहे. म्हणूनच पाकिस्तानने भारतापुढे नवीन प्रस्ताव ठेवत आम्हाला युद्ध नको शांती हवी आहे, असं म्हटलं आहे.