Home राष्ट्रीय पाकिस्तानात युद्धाच्या पूर्वतयारीला वेग; रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश.

पाकिस्तानात युद्धाच्या पूर्वतयारीला वेग; रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश.

0

प्राईम नेटवर्क : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने आंतराष्टीय पातळीवर देखील पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. “भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर उत्तर देणार” अशी उद्धट धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली होती. युद्धाच्या स्वरुपातही भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने युद्धाची पूर्वतयारी सुरु केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या हेडक्वार्टर्स क्वेट्टा लॉजिस्टिक्स एरियाकडून २० जानेवारी रोजी जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्यानुसार वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्याचे रुग्णालयाला सांगण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांनाही २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यासोबत उपचाराच्या सर्व सुविधांसहित सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवारी पाकिस्तानव्याप्त काश्मीर सरकारने नीलम, जेहलूम, रावलकोट, हवेली, कोटली आणि भिंबर येथील स्थानिक प्रशासनाला पत्र पाठवत भारतीय लष्कर गोळीबार करु शकतो त्यामुळे त्याप्रमाणे तयारी करण्यास सांगितले आहे.

यामध्येही असेही सांगण्यात आले आहे की, ‘लॉजिस्टिक्स परिसरात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत मिळावी यासाठी योजना आखण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून, सिव्हिल रुग्णालयांमध्ये जवानांसाठी २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पाकिस्ताने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तेथून हटवले आहे. पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचा आवाहन केले आहे. योसाबत कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्या वेळी गरज नसल्यास लाइट लावू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबत गुरांनाही नियंत्रण रेषेवर नेऊ नये असे स्पष्ट निर्देश आहेत.