Home आरोग्य रामदेव बाबाच्या कोरोना औषधाने ७ दिवसात कोरोना बरा होणार, पतंजलीचा दावा!

रामदेव बाबाच्या कोरोना औषधाने ७ दिवसात कोरोना बरा होणार, पतंजलीचा दावा!

0

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘करोनिल’ लाँच केले आहे. योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचा या औषध बनविण्यासाठी मोलाचा वाटा आहे . हरिद्वारच्या पतंजली योगपीठात हे औषध लाँच करण्यात आले.या औषधावरील संशोधन पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे केले आहे.

संशोधन करण्यासाठी क्लिनिकल कंट्रोल स्टडी आणि क्लिनिकल कंट्रोल ट्राय या दोन पद्धतीचा वापर केला असल्याचं रामदेव यांनी सांगितलं.क्लिनिकल कंट्रोल स्टडीसाठी दिल्ली, मेरठसह देशातील इतर भागात अनेक रुग्णांवर प्रयोग केले. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला.
त्यानंतर क्लिनिकल कंट्रोल ट्राय चा वापर केला. यामध्ये पंतजली रिसर्ज सेंटर आणि नॅशनल मेडिकल इन्स्टिट्युट सायन्स निम्स यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 लोकांवर उपचार करण्यात आले. यात 95 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता.यात 69 टक्के रुग्ण हे फक्त 3 दिवसांमध्ये बरे झाले आहे. जे रुग्ण कोरोनाबाधित होते, त्याचे रिपोर्ट हे 3 दिवसांनी निगेटिव्ह आले आहे. एवढेच नाहीतर सात दिवसांमध्ये रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करण्यासाठी सीटीआरची परवानगी घेण्यात आली होती. यामध्ये ज्या रुग्णांना कोरोनिल देण्यात आले नव्हते. त्यांच्यामध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. यामध्ये शंभर टक्के प्रकृती सुधारण्याचा दर असल्याचा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.