काही दिवसांपूर्वी भारतातील किशोरवयीन व तरुण मुलामुलींमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला Pubg या मोबाईल गेमवर बंदी घालणार आली होती. मात्र या गेमच्या कंपनीने आता भारतीय कंपनी म्हणून नोंदणी केली असल्याने Pubg भारतात पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तसेच यासाठी कंपनीला केंद्र सरकारची मान्यतादेखील मिळाली आहे.
Pubg कोर्पोरेशनची Pubg इंडिया ही एक सहाय्यक कंपनी म्हणून २० नोव्हेंबरला कर्नाटकमध्ये स्थापन करण्यात आली असून PUBG India Private Limited अशा नावाने कंपनीची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच या कंपनीला CIN नंबरही देण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या कंपनीने भारतीय वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट क्लाउड सर्व्हिसचा Azure हा प्लॅटफॉर्म वापरणार असल्याचे सांगितले आहे.