Home राष्ट्रीय केंद्राचा मोठा निर्णय; यापुढे दारिद्र्यरेषा ठरणार राहणीमानावरून

केंद्राचा मोठा निर्णय; यापुढे दारिद्र्यरेषा ठरणार राहणीमानावरून

0

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने दारिद्र्यरेषा ठरवण्याचे निकष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया न्यूजनुसार ग्रामविकास मंत्रालयाने गरिबीविषयक कार्यदस्त जारी केला आहे. या कार्यदस्तात यापुढे दारिद्र्यरेषा व्यक्तीचे/कुटुंबाचे उत्पन्न पाहून नाही तर राहणीमान, स्वच्छता, शिक्षण, घर अशा गोष्टींचा दर्जा पाहून ठरवण्यात येईल.

लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार ग्रामविकास मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सीमा गौर व एन श्रीनिवास राव यांनी हे गरिबीविषयक कार्यदस्त सादर केले आहे. यात ते पुढे म्हणाले की सध्या दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी वापरला जाणारे निकष वादग्रस्त व सदोष आहेत. त्यामुळे ही सीमारेषा ठरवण्याचे निकष बदलण्याची आवश्यकता असून राहणीमान पाहून ती ठरवल्यास गरीब यापासून वंचित राहणार नाही असेही त्यांनी मत मांडले. या सर्व बाबींचा विचार करून दारिद्र्यरेषा ठरवण्याचा निकष यापुढे उत्पन्न नसून राहणीमान असेल असे ग्रामविकास मंत्रालयाने ठरवले आहे.