Home राष्ट्रीय पेट्रोल फक्त ३६ रुपयांना मिळू शकते, भाजप मंत्री प्रकाश जावडेकरांचा व्हिडिओ व्हायरल!

पेट्रोल फक्त ३६ रुपयांना मिळू शकते, भाजप मंत्री प्रकाश जावडेकरांचा व्हिडिओ व्हायरल!

0

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ऎतेहासिक नीचांकी असताना भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेल किंमती ह्या गगनाला भिडल्या आहेत, मुंबई मध्ये पेट्रोल हे लिटर मागे ८७ रुपये इतके महागले आहे, डिझेल तर इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोल पेक्षा महाग झाले आहे. सर्वसामान्य जनता या दरवाढीच्या चिंतेत असताना, प्रकाश जावडेकरांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, या व्हिडीओ मध्ये पेट्रोल फक्त ३६ रुपये लिटर प्रमाणे मिळू शकते असा दावा केला आहे.

प्रकाश जावडेकर या व्हिडिओ मध्ये म्हणतात, ” सरकारने ज्या किमंती वाढविल्या आहेत त्याला कुठलाही आधार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमंती अत्यंत कमी झाल्या आहेत. सरकारला चॅलेंज आहे की पूर्णपणे refine केलेलं पेट्रोल हे दिल्ली मध्ये ३४ रुपयाला मिळू शकते तर मुंबईमध्ये ते ३६ रुपयाला मिळू शकते तर त्याचे भाव दुप्पट पेक्षा जास्त का आहेत?ही पूर्णपणे सामान्यांची लूट असून पेट्रोल डिझेल च्या किंमती तात्काळ कमी करायला हव्यात”

प्रकाश जावडेकर जे सध्या माहिती आणि प्रसार मंत्रालय सांभाळतात यांनी २०१२ साली काँग्रेस सरकार विरुद्ध एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यामधला हा व्हिडिओ असून, सद्यस्थितीला भाजप आणि त्यावेळी काँग्रेस हे किती सारखे होते हे या व्हिडिओ मधून कळून येते, सामान्य नागरिकांनी या व्हिडिओ ला प्रचंड व्हायरल केले असून प्रत्येकजण ३६ रुपये पेट्रोल केंव्हा मिळणार असा प्रश्न विचारत आहेत.