Home राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात दाखल होणार; या ठिकाणांना भेटी देणार

0

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स या कंपन्यांमध्ये कोरोना लसीवर संशोधन सुरु आहे. हे संशोधन अखेरच्या टप्प्यात असून येथील लसी लवकरच सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या दोन्ही कंपन्यांना भेट देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अर्थात शनिवारी २८ नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्यावेळी ते कोरोना लस बनवत असलेल्या या दोन्ही कंपन्यांतील सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत असे मीडिया न्यूजवरून समजते.

सीरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो फार्मासिटिक्युअल्स येथे कोविशील्ड या लशीवरील संशोधन अखेरच्या टप्प्यात असल्याने तेथील प्रगती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान मोदी उद्या दुपारी १ ते दोन या वेळेत या कंपन्यांना भेटी देणार आहेत. त्यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अधिकारी अदर पूनावाला व इतर शास्त्रज्ञ मंडळी पंतप्रधानांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या सर्व भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त केला आहे.