Home राजकीय “प्रधानमंत्री कार्यालय हिंदू विरोधी अधिकाऱ्यांनी भरलेले आहे, त्यातले बरेच जण शरद पवारांच्या...

“प्रधानमंत्री कार्यालय हिंदू विरोधी अधिकाऱ्यांनी भरलेले आहे, त्यातले बरेच जण शरद पवारांच्या संपर्कातले”- सुब्रमण्यम स्वामी

0

‘दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय हे हिंदू विरोधी प्रशासकीय अधिकार्यांनी भरलेले आहे व यातील अधिकारी हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असतात’ असा खळबळजनक दावा भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

स्वामी यांनी ट्विट करत हा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, “हे हिंदूविरोधी अधिकारी देशभक्त अधिकाऱ्यांना काम करू देत नाहीत आणि त्यांच्या कामात अडथळा आणतात. CAA विरुद्ध वातावरण व दिल्ली हिंसाचार या गोष्टींमुळे आपण या बाबीवर लक्ष टाकायला पाहिजे.” पंतप्रधान कार्यालय हे मोदींच्या विश्वासू अधिकाऱ्यांनी गजबजलेलं असतं अशा आशयाच्या चर्चा नेहमीच कानावर पडत असतात पण सुब्रमण्यम स्वामींच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

वाचा काय म्हणाले सुब्रमण्यम स्वामी