
हैद्राबाद मध्ये बुधवारी अतिशय हृदयद्रावक घटना घडली. २७ वर्षीय प्रियंका रेड्डी या वेटरनटी डॉक्टरवर काही क्रूर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून तिला जाळून टाकले. तेलंगणा जिल्ह्यातील रंगा रेड्डी येथे ही घटना घडली. एका सबवे मध्ये तरुणीचा जळालेला मृतदेह आढळला. प्रियांकाच्या मृतदेहाचा फोटो सोशल मिडीवर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहून सबंध देश हादरला आहे. सदर प्रकरणाबाबत सायबराबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी मोहम्मद पाशाला गजाआड टाकण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार पाशा ट्रक ड्राइव्हर असून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी लोक सोशल मीडियावर इच्छा व्यक्त करीत आहेत.
या घटने नंतर सबंध देश पेटून उठला असून सर्व आरोपींना पकडून कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. या घटने बद्दल हळहळ व्यक्त करत ट्विटरवर #RIPPriyankaReddy #DrPriyankaReddy #justiceForPriyankaReddy हे हॅशटॅग ट्रेंड करीत आहेत. अंगावर शहारा आणणारा हा प्रकार पाहून संतप्त लोक आरोपींना जाळून मारा किंवा फाशी द्या अशी मागणी करीत आहेत.