Home राष्ट्रीय पुलवामा हल्ला : दहशतवादी आदिल अहमद दारने घेतला स्थानिक रहिवाशी असल्याचा फायदा.

पुलवामा हल्ला : दहशतवादी आदिल अहमद दारने घेतला स्थानिक रहिवाशी असल्याचा फायदा.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर महामार्गावर गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात 40 च्यावर जवान शहीद झाले. सीआरपीएफचा ताफा या महामार्गावरून जाण्याआधी जवानांकडून सुरक्षेचा सर्व बंदोबस्त करण्यात आला होता. मात्र यात एक छोटी चूक झाली व त्यामुळे जवानांना जीव गमवावा लागला.

सीआरपीएफने हा ताफा जात असतानाही स्थानिक रहिवाशांच्या गाड्यांना महामार्गावरून जाण्यास परवानगी दिली होती व त्याचाच फायदा घेत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दारने हा हल्ला घडवून आणला.

सीआरपीएफने जवानांचा ताफा येण्याआधी महामार्गावरील सर्व वाहतूक रोखली गेली. रोड ओपनिंग पार्टीने संपूर्ण मार्गावर गस्त घालून सुरक्षा यंत्रणा तपासली होती; मात्र याआधी देखील अशा लष्करी हालचाली सुरू असताना स्थानिकांच्या गाड्यांना रोखल्याने त्यांची नाराजी असायची. याविरोधात तिथल्या लोकांनी मागणी केली होती की स्थानिकांची वाहनं रोखली जाऊ नयेत. त्यानंतर स्थानिकांवर विश्वास ठेवून स्थानिकांच्या वाहनांना परवानगी दिली जात होती.

गुरुवारी देखील जवानांनी स्थानिक नागरिकांना त्यांच्या गाड्या महामार्गावरून नेण्यास परवानगी दिली होती. दहशतवादी आदिल अहमद दार हा पुलवाम्यातील रहिवाशी आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशी असल्याचा फायदा घेत त्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफच्या ताफ्यातील पहिल्या गाडीला धडकवली. या हल्ल्यात 40 च्यावर जवान शहीद झाले.