Home राष्ट्रीय पुलवामा अटॅक : हिंदुस्थानात घडामोडींना वेग, दिल्लीत बैठकांवर बैठका.

पुलवामा अटॅक : हिंदुस्थानात घडामोडींना वेग, दिल्लीत बैठकांवर बैठका.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना चांगलाच वेग आलेला दिसत आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या सरकारने कडक धोरण स्वीकारत कर्जबाजारी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पाडण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि पाकिस्तानातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी “भारताने युद्ध छेडल्यास पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर उत्तर देणार” अशी उद्धट, पोकळ धमकी दिली होती. यानंतर पाकिस्तानातील हिंदुस्थानचे उच्चायुक्त अजय बिसारिया हे बुधवारी गृह मंत्रालयात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. बिसारिया यांच्यासह अमेरिकेतील हिंदुस्थानचे उच्चायुक्त हर्षवर्धन श्रींगला हे देखील गृहमंत्रालयात पोहोचले असून त्यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेत चर्चा केली.

या बैठकांमध्ये काय झाले याबाबत माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. परंतु पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी पुढील पाऊल काय असावे याबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता दर्शविण्यात येत आहे.