
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थांनाणे अर्थात NASA ने मोहिमेसाठी चंद्रावर पाठविण्यात आलेल्या विक्रम लॅण्डरचा शोध लागल्याची माहिती एका ट्विट द्वारे दिली. प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार नासाच्या ऑर्बिटर चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रायन 2 चे अवशेष मिळाले. विक्रम लॅण्डर शोधण्यात भारताच्या 33 वर्ष तरुणाने महत्वाची भूमिका बजावली अशीही माहिती NASA ने दिली. हा तरुण चेन्नईतील मेकॅनिकल आणि कॉम्प्युटर प्रोग्रॅमर इंजिनियर असून त्याचे नाव शनमुगा सुब्रमण्यम आहे.
सुब्रमण्यम यांनी सर्वप्रथम विक्रम लॅण्डर चे अवशेष ओळकले आणि नसला त्याची बातमी दिली. नासाने केलेल्या ट्विट मध्ये सुब्रमण्यम यांचा उल्लेख केला आहे. विक्रम लॅण्डर चे तीन अवशेष आढळले असून चंद्रावरच्या ज्या सावट भागावर विक्रम लॅण्डर आदळलं तिथून 750 मीटर अंतरावर हे अवशेष मिळले आहेत.