Home राष्ट्रीय “तिने” मिळवल भारतातलं पहिलं “नो कास्ट,नो रिलीजन” सर्टिफिकेट.

“तिने” मिळवल भारतातलं पहिलं “नो कास्ट,नो रिलीजन” सर्टिफिकेट.

0

प्राईम नेटवर्क : फ्रेंडस,नावात काय आहे ?अस आपण जरी म्हणलं तरी आपण नाव ऐकुनच माणसाशी कस वागायच ते ठरवतो. बरोबर ना ? तुम्ही कितीही नाही म्हणून सर्वधर्म समभाव या मूल्याबद्दल बोललात तरी जन्माला येताच आपल्याला जात आणि धर्म चिकटतोच. फारच कमी लोक असे असतात ज्यांना जात आणि धर्माची काही पडलेली नसते. आज आपण एका अशा महिलेबद्दल जाणून घेणार आहोत जिने फक्त जात आणि धर्मच लावणं सोडलेलंच नाही, तर भारतातलं पहिलं “नो कास्ट,नो रिलीजन” सर्टिफिकेट मिळवलं आहे. अहो खरचं !

तिरुपत्तुर,वेल्लोर येथील स्नेहा यांनी हे सर्टिफिकेट मिळवलं आहे. स्नेहा या स्वतः वकील आहेत. बालपणापासून त्यांच्या आईवडिलांनी जन्माचा दाखला असो किंवा शाळेतील नाव नोंदणी किंवा इतर कागदपत्रांवर जात-धर्म नोंदवलेला नाही. आईवडिलांचे हेच संस्कार स्नेहा यांनी आत्मसात केले आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या कोणत्याच कागदपत्रांवर जात धर्म नोंदवलेला नाही. मात्र त्यांची ओळख ‘भारतीय’ अशीच आहे,बर का ?

अनेक कागदपत्रांमध्ये जात-धर्म लिहिणं बंधनकारक असतंच त्यामुळे एखाद्याने जात आणि धर्म न लिहिण्याचं ठरवलं तरी हे इतक सोप नाही. हेच लक्षात घेऊन स्नेहा यांनी एक पाऊल पुढे जायचं ठरवलं. ‘जात आणि धर्म’ नसलेल्या या सर्टिफिकेटसाठी त्यांनी २०१० साली अर्ज केला होता.

जातीचे सर्टिफिकेट आपण सगळ्यांनीच पहिले असतील,पण जात नसलेल्या सर्टिफिकेटची ही पहिलीच वेळ होती. आता तुम्हाला कळलं की हे सर्टिफिकेट मिळवणं सोप्पं नव्हतं. यात कुणाचा काही विरोध नव्हता पण हे असं सर्टिफिकेट यापूर्वी कधीच कोणीच मागितलं नव्हतं. शेवटी अशाही प्रकारचं सर्टिफिकेट मिळू शकतं हे तिने सिद्ध केल. यासाठी स्नेहा यांनी सरकारपुढे आपली बाजू खंबीरपणे मांडली होती. पठ्ठीला ९ वर्ष लागलीत हे मिळवायला,तिच जितकं कौतुक कराव तितकं कमीच आहे.मग आता कुणाकुणाला हे असल “नो कास्ट,नो रिलीजन” प्रमाणपत्र हवयं ?