Home राष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावातील चौथऱ्यावरून हटवल्याने शिवभक्तांमध्ये संताप!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावातील चौथऱ्यावरून हटवल्याने शिवभक्तांमध्ये संताप!

0

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात चौथऱ्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाद्वारे रात्रभरात हटवण्यात आला. यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून येत्या रविवारी ९ ऑगस्टला कर्नाटकात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्रातील कोल्हापुरातील शिवभक्तांनी दिला असल्याचे न्यूज 18 लोकमतच्या न्यूजवरून समजले.

अधिक माहितीनुसार हा पुतळा मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या संमतीने बसवण्यात आलेला होता. लोकमतच्या मीडिया न्यूजनुसार मनगुत्ती येथे गेल्या २ वर्षांपासून हा पुतळा बसवण्यासाठी गावकरी प्रयत्न करत होते. सहा महिन्यांपूर्वी या पुतळ्यासाठी चबुतरा देखील तयार करण्यात आला होता. गावकऱ्यांनी तेथे गेल्या गुरुवारी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली. मात्र गावातील काही लोकांनी त्याला विरोध केल्यामुळे कर्नाटक सरकारने शुक्रवारी रात्री हा पुतळा तेथून हटवला. यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुतळा पुन्हा बसवण्यासाठी आंदोलने होत आहेत तसेच मनगुत्ती गावातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावात जवळपास ८०% लोकसंख्या मराठी कुटुंबांची आहे. त्यामुळे हा पुतळा हटवू नये अशी मागणी होत होती. परंतु यासाठी पोलिसांची आणि तहसीलदारांनी परवानगी नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले व शुक्रवारी रात्री इलेक्ट्रिसिटी बंद करून पुतळा हटवला गेल्याने गावकरी संतापले आहेत.