भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आज (शुक्रवार) गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आपले सहा जवान जखमी झाले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे आणि अशात सुद्धा पाकिस्तान सीमेवर गोळीबार करत आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये सुदंरबनी परिसरात पाकिस्तानकडून खूप मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानचे हे या आठवड्यातील दुसरे शास्त्रसंधीचे उल्लंघन आहे,भारतीय जवानांनीही याचे चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत ६ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये ४ जवान आणि २ बीएसएफचे जवान आहेत.
सैन्य संदर्भात अजून एक बातमी नवी मुंबईतून सुद्धा आहे. नवी मुंबई मध्ये CRPF च्या ६ जवानांना कोरोना चे संक्रमण झाले आहेत मागील आठवड्यात सुद्धा याच तुकडीतील ५ जवानांना कोरोना झाला होता.केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांना तातडीने विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका केवळ प्रशासनाच्या निर्णयामुळे कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणा-या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.