
दिल्लीत झंडेवालान भागातील चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार पहाटे लागेल्या या आगीची माहिती अग्नीशमन दलाल पाच वाजेच्या नंतर मिळली व माहिती मिळताच ५:३० पर्यत अग्निशमन दल आग विजवण्याचे ५० हुन अधिक बंब घेऊन घटनास्थळी पोहचले. इमारत अतिशय अरुंद गल्लीत असल्याने अग्निशमन दला समोर मोठं आव्हान होतं. तब्बल चार तासांच्या शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात अली दरम्यान अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी जखमी झाले.
हाती आलेल्या अधिक माहिती नुसार इमारतीच्या चौथ्या मजल्याणवर प्लॅटिकच्या वस्तू बनविण्याचा कारखाना होता. येथे कामकरणारे मजूर काम झाल्या नंतर इथेच झोपत असत मात्र या आगीची कल्पना नसल्याने बऱ्याच बाहेर गावच्या मजुरांचा या ठिकाणी दुर्दवी मृत्यू झाला. इमारतीत अंदाजे 60 लोक होते त्यापैकी 43 जणांचा मृत्यू झाला तर 14 जखमी झाले अग्नी शमन दलाने दिलेल्या माहिती नुसार इमारतीतील लोक चहूबाजुनी आग लागल्यामुळे वेळीच बाहेर नाही काढता आले व धुरामुळे स्वास न घेता आल्याने अनेकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले. जखमींवर उपचार चालू असून पंतप्रधान मोदींनी देखील या घटनेवर खंत व्यक्त केली. इमारतीचे मालक रेहान यांना पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी चालू आहे.