Home राष्ट्रीय निर्भयाच्या चारही आरोपींना होणार एकाच वेळी फाशी; न्यायालयाचा अंतिम निर्णय

निर्भयाच्या चारही आरोपींना होणार एकाच वेळी फाशी; न्यायालयाचा अंतिम निर्णय

0

निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना सोबत फाशी होणार की वेगवेगळी हा बऱ्याच दिवसांपासून लांबणीवर असलेला मुद्दा अखेर दिल्ली हायकोर्टाने मार्गी लावला असून चौघांनाही एकाच वेळी फाशी देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. मीडिया न्यूजनुसार पटियाला हाऊस कोर्टाने या चार आरोपींच्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. यावर दिल्ली पोलीस, तिहार तुरुंग व केंद्र सरकारने आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी याचिका उच्च न्यायालयात सादर केली होती. ही याचिका फेटाळून लावत उच्च न्यायालयाने चारही आरोपींना एकाच वेळी फाशी दिली जाईल असा निर्णय दिला.

एका मीडिया रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालयात खटला प्रलंबित असला तरच फाशीची शिक्षा थांबवण्यात येते, असे न्यायालयाने म्हटल्यामुळे चारही आरोपींना आता एकाच वेळी फाशी दिली जाणार आहे. त्यासोबतच हायकोर्टाने या आरोपींना सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यासाठी ७ दिवसांची मुदतही दिली आहे. तसेच लोकमतच्या रिपोर्टनुसार हायकोर्टाने आपल्या आदेशात एका आठवड्यात डेथ वॉरंट लादण्याची प्रक्रिया सुरू होईल असे स्पष्ट केले.