
कोरोनाच्या संकटकाळात देशासाठी १५०० कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा टाटा देशाच्या मदतीसाठी धावले आहेत. पीपीई किट्स, सर्जिकल मास्क, ग्लोव्ज यासारख्या अत्यावश्यक वस्तू एअरलिफ्ट करण्याचं काम आता टाटा ट्रस्टकडून करण्यात येणार आहे.
१५० कोटी रुपयांचं हे वैद्यकीय साहित्य टाटा ट्रस्टकडून देशभरात एअरलिफ्टच्या माध्यमातून पोहोचवलं जाणार आहे जाईल. टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या वतीनं ही मदत केली जाणार असल्याची माहिती टाटा ट्रस्टनं दिली आहे.
“येत्या काही आठवड्यांमध्ये विविध टप्प्यांमध्ये सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये हे वैद्यकीय साहित्य पाठवलं जाणार आहे. या साहित्याचं मूल्य १५० कोटी रुपये इतकं असेल”, अशी माहिती टाटा ट्रस्टनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान, टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहानं याआधीही कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी १५०० कोटी रुपयांच्या मदत जाहीर केली आहे. आता टाटांच्या या नव्या मदतीनं देशाला पुन्हा एकदा मोठा फायदा होणार आहे.