Home राष्ट्रीय शहिद कर्नलच्या फोन वरून अतिरेकी म्हणाला, “सलाम वालेकुम!”, जवानांनी शोधून केला...

शहिद कर्नलच्या फोन वरून अतिरेकी म्हणाला, “सलाम वालेकुम!”, जवानांनी शोधून केला एन्काऊंटर

0

देश कोरोनाशी लढत असताना जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हैदोस कायम आहे. हंदवाडा जिल्ह्यामधील चकमकीत आज लष्कराचे आणि पोलिसांचे ४ अधिकारी शहीद झाले होते. या चकमकिची थरारक माहिती समोर येत असून शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांचा फोन अतिरेक्यांनी उचलला आणि त्याने दोन वेळा ‘सलाम वालेकुम’ असं म्हटल्याचं समोर आलंय. या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला असून त्यात लष्कर ए तैय्यबाचा टॉप कमांडर हैदर असल्याचंही सिद्ध झालं आहे.

शहीद झालेल्यांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नायक राजेश, लांस नायक दिनेश आणि जम्मू-कश्मीर पुलिसांचे सब-इंस्पेक्टर शकील काजी यांचा समावेश आहे.

शर्मा हे अतिशय धाडसी अधिकारी होते. त्यांना त्यासाठी दोन वेळा अतिशय सन्मानाचं समजलं जाणारं ‘वीरचक्र’ देण्यात आलं होतं.

हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती ही शनिवारी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करत असताना दहशतवाद्यांनी अतिशय तुफान गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र त्याच वेळी ४ जणांना शहीद व्हावं लागलं.

घरात ज्यांच्या नेतृत्वाखाली जावांनांची टीम घुसली होती ते लवकर परत आले नाहीत त्यामुळे बाहेरच्या टीमला काळजी वाटू लागली. गोळीबारामुळे मध्ये गेलेल्या लोकांची संपर्क यंत्रणा बंद पडली होती. शेवटी शर्मा यांच्या फोनवर जेव्हा रिंग करण्यात आली तेव्हा अतिरेक्यांनी फोन उचलला आणि ‘सलाम वालेकुम’ असं तो म्हणाला. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने तसच म्हटलं आणि फोन कट केला अशी माहिती दिली जात आहे. यानंतर सैन्याने या अतिरेक्यांना पकडून ठार मारले.