प्राईम नेटवर्क : कमी शिक्षण असलेल्या लोकांच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये शिक्षित बेरोजगारी अधिक प्रमाणात वाढली असल्याचे सर्वेक्षण समोर आले आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिसने (एनएसएसओ) ही माहिती दिली आहे.
या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, २०१७-१८ मध्ये सुशिक्षित कौशल्यप्राप्त लोकांची संख्या दुप्पट झाली आहे. त्या तुलनेत २०११-१२मध्ये कौशल्यप्राप्त लोकांची संख्या कमी होती. या सर्वेक्षणातून असेही संकेत मिळत आहेत की, २०१७-१८मध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक होते.
विशेषत: ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक होते, जिथे तरुण महिलांना पुरुषांच्या तुलनेत शिक्षणाची अधिक संधी मिळाली.जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सेंटर आॅफ इन्फॉर्मल सेक्टर अँड लेबर स्टडिजचे अध्यक्ष संतोष मल्होत्रा म्हणाले की, १५-१६ वर्षाच्या वर्गातील एकूण माध्यमिक नोंदणी दर २०१० मधील ५८ टक्क्यांवरून २०१६ मध्ये ९० टक्क्यांवर गेला आहे.
बिगर कृषी क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्यात यशस्वी न ठरणारे लोक बेरोजगार राहिलेत. २००४-०५ आणि २०११-१२ च्या दरम्यान बिगर कृषी रोजगार वाढत होते. म्हणून बेरोजगारीचा दर घटत होता. ज्या तरुणांनी औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे, त्यांची संख्या २०११-१२ मध्ये २.४ टक्के होती. ती २०१७-१८ मध्ये २.५ टक्के झाली. याशिवाय २.२ टक्के लोकांनी नोकरी करत व्यावसायिक शिक्षण घेतले, तर १.८ टक्के लोकांनी स्वत:च कौशल्य आत्मसात केले.
२०१७-१८ मध्ये विशेषत: ग्रामीण भागातील साक्षरतेत सुधारणा झाली आहे. या सर्व्हेनुसार राष्ट्रीय बेरोजगारी ६.१ टक्के होती. २०११-१२ मध्ये बेरोजगारी चा टक्का ५.९ इतका होता. हल्लीचा म्हणजेच २०१७-१८ ला यात ६.५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे.