Home राष्ट्रीय विंग कमांडर अभिनंदन यांच्या आयुष्यात 60 तासांमध्ये घडलेला सुटके पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम

विंग कमांडर अभिनंदन यांच्या आयुष्यात 60 तासांमध्ये घडलेला सुटके पर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम

0

प्राईम नेटवर्क : भारतीय हवाई दलाच्या मिरज 2000 या विमानांनी मंगळवारी 26 फेब्रुवारी रोजी, पाकिस्तान मधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यात 250 – 300 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला, यांनतर पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान झाला, आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी बुधवारी 27 फेब्रुवारी ला पाकच्या 24 विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांनी तात्काळ पॅराशुटद्वारे उडी मारली…

मात्र भारतीय हवाई दल सक्रिय असल्याने त्यांनी एफ 16 या पाकिस्तानी विमानांना पळवून लावलं, याच कारवाई दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांचं मिग 21 विमान चुकून पाकिस्तानी हद्दीत कोसळलं, परंतु त्यांनी तात्काळ पॅराशुटद्वारे उडी मारली.

स्थानिकांनी त्यांना खोटेच सांगितलं कि तुम्ही भारतात आहात

या वेळी त्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडल्यावर त्यांनी स्थानिकांकडे पाणी मागितलं, स्थानिकांना विचारलं मी भारतात आहे कि पाकिस्तानमध्ये, यावेळी स्थानिकांनी त्यांना खोटेच सांगितलं कि तुम्ही भारतात आहात, यावेळी त्यांनी ‘भारत माता कि जय’ अशी घोषणा दिली, या नंतर स्थानिकांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी अभिनंदन यांनी जवळील बंदुकीतून फायरिंग करत बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्यांनी त्यांच्या जवळील महत्वाची गोपनीय कागद पत्रं, शत्रूच्या हाती लागू नये म्हणून खाल्ली, आणि काही कागद त्यांनी जवळील तळ्यात फेकले, आणि स्वतः देखील तळ्यात उडी मारली.

अभिनंदन यांना स्थानिकांनी आणि पाकिस्तानी सैनिकांनी मारहाण केली

मात्र स्थानिकांनी त्यांना पकडून पाकिस्तानी पोलीस आणि जवानांच्या ताब्यात दिले. या वेळी अभिनंदन यांना स्थानिकांनी आणि पाकिस्तानी सैनिकांनी मारहाण केली, आणि त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केले.

चूक लक्षात आल्या नंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलला

व्हिडिओ प्रसिद्ध झाल्या नंतर जगभरात पाकिस्तानवर जोरदार टीका होऊ लागली, आणि यावेळी भारताने पाकिस्तानला जिनिव्हा कराराची आठवण करून दिली, पाकिस्तानला हि चूक लक्षात आल्या नंतर पाकिस्तानने आपला पवित्रा बदलला, आणि अभिनंदन यांचा चहा पीत गप्पा मारत असताना दुसरा नवीन व्हिडिओ प्रसिद्ध केला.

अन्यथा पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल

या दरम्यान भारताने पाकिस्तानला इशारा दिला, भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना विना अट भारताच्या ताब्यात सुपूर्द करण्यात यावं, अन्यथा पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.

पाकिस्तान वरील दबाव आणखीनच वाढला

दरम्यान पाकिस्तानवर अंतरराष्ट्रीय दबाव वाढला, सौदी अरेबियाने पाकिस्तानचे कान टोचले, आणि अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द करण्यासाठी सूचना केली. चीन, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका यांनी सुद्धा भारताच्या बाजूने मत व्यक्त केलं. पाकिस्तान वरील दबाव आणखीनच वाढला, यानंतर पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेतून विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात सुपूर्द करणार असल्याचं जाहीर केलं.

48 तासातच सोडून देणार असल्याचं जाहीर केलं

यापुढे सुरु झाला विंग कमांडर अभिनंदन यांचा सुटकेचा प्रवास. भारताने पाकिस्तानवर टाकलेला दबाव भारताच्या कामी आला, आणि पाकने अभिनंदन यांना 48 तासातच सोडून देणार असल्याचं जाहीर केलं, अभिनंदन, यांना पाकिस्तानने शुक्रवारी रात्री तब्बल 9 वाजून 21 मिनिटांनी भारताकडे सुपूर्द केलं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, यांनी त्यांचं ट्विट करून स्वागत केलं. हा भारताचा आणखी एक कूटनीतिक विजय मानला जातोय.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मोठ्या धैर्याने परिस्थिती समोर उभे राहून देशाचं संरक्षण करत जीवाची पराकाष्ठा करणारे वीर विंग कमांडर अभिनंदन यांना प्राईम मराठी कडून मानाचा सलाम.

देश भरातील महत्व पूर्ण बातम्या आणि माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, बातम्या वाचण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा, मित्रां सोबत शेअर करा, आणि आपली प्रतिक्रिया कमेंट द्वारे अवश्य कळवा.