
इस्रोने आज अर्थात शुक्रवारी १७ जानेवारी रोजी पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी GSAT-30 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर काही वेळानंतर GSAT-30 वरून एरियन -5 VA251चा वरचा भाग यशस्वीरीत्या वेगळा झाला. लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार हा उपग्रह अवकाशात १५ वर्षं काम करणार आहे. या उपग्रहाला जिओ इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये बसविण्यात आलं असून, यात दोन सोलर पॅनल व बॅटरी आहे, ज्यामुळे ऊर्जा उत्पन्न होईल व साठवली देखील जाईल. परिणामी या उपग्रहाचे काम देखील चालत राहील.
मिळालेल्या एशिक माहिती नुसार GSAT-30 हा एक संचार उपग्रह असून तो इनसॅट-4 या सेटलाइटच्या जागेवर काम करणार आहे असं इस्रोद्वारे सांगितलं जात आहे. इनसॅट सॅटेलाइट-4चं वय पूर्ण होत आलं आहे. सोबतच इंटरनेट टेक्नोलॉजीमध्येही अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. म्हणून आता एका आधुनिक व शक्तीशाली उपग्रहाची आवश्यकता होती. त्यासाठी इस्रोनं GSAT-30चं प्रक्षेपण केलं आहे अशी माहिती मिळत आहे.