Home राष्ट्रीय ‘अतिश्रीमंतांचा कर वाढवून गरीबांना महिन्याचे ४ हजार रुपये द्या’ असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर...

‘अतिश्रीमंतांचा कर वाढवून गरीबांना महिन्याचे ४ हजार रुपये द्या’ असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

0

भारतीय महसूल सेवेत कार्यरत असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देशातील अतिश्रीमंत लोक म्हणजे ज्यांचे उत्पन्न १ कोटी पेक्षा जास्त आहे अशा लोकांकडून जास्तीचा कर गोळा करून त्यामधून जमा झालेल्या रकमेतून गरिबांना महिन्याला ४००० रुपये पुरवता येतील असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली आहे.

अधिकाऱ्यांच्या मते अतिश्रीमंतावर लागलेल्या या जास्तीच्या करामुळे देशातील १२ कोटी गरीब कुटुंबाना महिन्याचे ४ ते ५ हजार रुपये देने शक्य होऊ शकेल तसेच लोकांच्या हातात पैसे आल्यामुळे मागणीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना सुद्धा मिळेल. अमेरिका देशामध्ये सुद्धा सदर कल्पनेची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सूरु झाल्या आहेत. मात्र भारत सरकारने या अधिकाऱ्यांच्या या सूचना धुडकावून लावत उलटपक्षी त्यांना गुन्हेगार ठरवले आहे.

श्रीमंतांवर कर लावून गरिबांना पैसे द्या म्हणणाऱ्या या अधिकाऱ्यांवर सरकारने कायद्याचा बडगा उगारला आहे. केंद्रीय कर आकरक मंडळाने (CENTRAL BORAD OF DIRECT TAX) यांनी या अधिकाऱ्यांवर सदर मत हे त्यांना विचारून का नाही मांडण्यात आले असा ठपका लावला असून, या अधिकाऱ्यांवर आता कायदेशीर प्रक्रिया होणार आहे