Home राष्ट्रीय पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावांकडे रवाना.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावांकडे रवाना.

0

प्राईम नेटवर्क: जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. भारताच्या या वीर जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत असून,महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

शहीद संजय राजपूत आणि शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर दाखल झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक विमानतळावर दाखल झाले होते. पुलवामा येथील हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले होते.

बिहारमधील शहीद जवान रतन कुमार ठाकूर आणि संजय कुमार सिन्हा यांना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी आदरांजली वाहिली. पुलवामा येथील हल्ल्यात वीरमरण आलेले सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना त्यांच्या मुलीने श्रद्धांजली वाहिली. पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेले वारणसी येथील जवान रमेश यादव यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.