Home तंत्रज्ञान मोबाईल नंबर का होणार आहे ११ अंकी?

मोबाईल नंबर का होणार आहे ११ अंकी?

0

तुम्ही कालपासून पाहत असाल की सर्वत्र मोबाईल नंबर ११ अंकी होणार अशी चर्चा आहे. पण तसं का हेही तुम्हाला सविस्तर माहिती असायला हवं. टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ही संस्था मोबाईलचा नंबर १० अंकांवरुन ११ अंकांचा करणार आहे. वाढती लोकसंख्या आणि त्या सोबतच बाजपेठेत वाढती मागणी पाहता सिम कार्डच्या संख्येत वाढ करण्याचा विचार सदर संस्था करीत आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, कनेक्शनच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी नंबर रिसोर्सेजला धोका नाकारता येत नाही असे TRAI कडून सांगण्यात येते. आपल्या देशात सध्या १२० कोटी कनेक्शन्स आहेत जे भविष्यात दुपटीने वाढण्याची संभाव्य शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून TRAI ला विविध उपाययोजना करून २०५० पर्यंत २६० कोटी नंबर्सची गरज पडणार आहे. म्हणूनच यावर एक पर्यायी उपाय म्हणून मोबाईल नंबर १० अंकांवरून ११ अंकी करण्यात येणार आहे. जर असे झालेच तर डोंगलच्या कनेक्शनचे नंबर्स १३ अंकी होऊ शकतात. एकंदरीत वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी टेलिकॉम कंपनीने केलेला हा एक खटाटोप आहे.