Home राष्ट्रीय देशभरात १ जून पासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्यांंचे तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात

देशभरात १ जून पासून सुरू होणाऱ्या रेल्वेगाड्यांंचे तिकीट बुकिंगला आजपासून सुरुवात

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनपासून देशभरात २०० प्रवासी ट्रेन सुरु होणार आहे. यासाठी आज म्हणजेच २१ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तिकीटाच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. ही तिकीटं ऑनलाईनच बुक करता येणार आहेत.

आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर लोक तिकीट बुक करु शकतील. या रेल्वे सेवेत जनशताब्दी ट्रेन, संपर्क क्रांती, दुरांतो एक्स्प्रेस आणि इतर नियमित प्रवासी ट्रेनचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनारक्षित डबे अजिबात नसणार आहेत.

मुंबईहून सुटणाऱ्या ट्रेन्स कोणत्या?

मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
LTT – दरभंगा एक्स्प्रेस
LTT – वाराणसी कामायनी एक्स्प्रेस
मुंबई CST – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस
मुंबई CST – गदग एक्स्प्रेस
मुंबई CST – बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस
वांद्रे टर्मिनस – जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेस
मुंबई CST – हैदराबाद हुसैनसागर एक्स्प्रेस
मुंबई सेंट्रल – अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेस
LTT – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस
मुंबई सेंट्रल – जयपूर एक्स्प्रेस
LTT – पाटलीपुत्र एक्स्प्रेस
LTT – गुवाहाटी एक्स्प्रेस
वांद्रे टर्मिनस – गोरखपूर अवध एक्स्प्रेस
वांद्रे टर्मिनस – मुझ्झफरपूर अवध एक्स्प्रेस

मुंबईला येणाऱ्या गाड्या

लखनऊ – मुंबई CST – पुष्पक एक्स्प्रेस
हावडा – मुंबई CST मेल
अमृतसर – मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल
अमृतसर – वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेस
पटना – LTT एक्स्प्रेस
गोरखपूर – LTT एक्स्प्रेस
पुण्याहून सुटणारी गाडी

पुणे – दाणापूर एक्स्प्रेस
1 जूनपासून सुटणाऱ्या ट्रेन्सची संपूर्ण यादी ANI या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्वीट केली आहे