Home राष्ट्रीय उत्तर प्रदेशमधून दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना केली अटक.

उत्तर प्रदेशमधून दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना केली अटक.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाझ आणि अकीब असे या दहशतवाद्यांचे नाव असून ते मुळचे कश्मीर मधील कुलगाम येथील रहिवासी आहेत.

पुलवामा येथे गेल्या आठवड्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ४१ जवान शहीद झाले होते. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादाविरोधातील मोहीम तीव्र केली आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एटीएसला मोठे यश मिळाले असून एटीएसने सहारनपूर येथील शाहनवाझ याला अटक केली आहे. शाहनवाझ हा ‘जैश’साठी तरुणांची भरती करायचा, असे सूत्रांनी सांगितले. त्याला ग्रेनेड तज्ज्ञ मानले जाते. दुसरा माणूस पुलवामाचा रहिवासी अकिब अहमद मलिक आहे. शाहनवाझ हा मूळचा जम्मू-काश्मीरच्या कुल्गमचे निवासी असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे

गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली. हे ठिकाण अनेक इस्लामिक सेमिनरी आणि शैक्षणिक संस्थांची ओळख मानलं जात. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेले पिस्तूल आणि गोळ्या ताब्यात घेतले आहे. “पुलवामाच्या हल्ल्याच्या आधी किंवा नंतर हे दोन लोक जैश-ए-मोहम्मदशी जोडले गेले होते की नाही हे सांगणे कठीण आहे,पण आमच्याकडे जैशशी असलेल्या कनेक्शनचा पुरावा आहे जे आम्ही सध्या शेअर करू शकत नाही,” असे सिंग म्हणाले.