राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर ‘जातीय आधारावर भेदाभेद करत सामाजिक तणावपूर्ण परिस्तिथी निर्माण करीत असल्याचा’ आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी मध्ये झालेल्या हिंसाचारात राजधानी दिल्ली जळत असताना ‘जातीय दंगलीत’ ४२ लोकांनी जीव गमावला.
महाविकास आघाडी सरकारच्या बजेट अधिवेशनाचे दुसरे पर्व सुरू होणार असून त्यामध्ये भाजपप्रणीत केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा काँग्रेस पक्षांचा कयास दिसत आहे.
ANI च्या वृत्तानुसार, ” काही दिवसांपासून देशाची राजधानी जळत आहे. केंद्रात राज्य करीत असलेल्या पक्षाला विधानसभेत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे समाजाला जातीय आधारावर विभागण्याचे प्रयत्न झाले” असे शरद पवार म्हणाले. दिल्ली हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत ४२ जण मृत्युमुखी तर ४५० लोक गंभीर जखमी आहेत तर दिल्ली पोलिसांनी २०३ गुन्हे दाखल केले आहेत.