Home राष्ट्रीय मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा, सगळं कुटुंब रुग्णालयात भरती

मेथीची भाजी समजून खाल्ला गांजा, सगळं कुटुंब रुग्णालयात भरती

0

उत्तर प्रदेशातील कनोज मध्ये एक अजब घटना उघडकीस आली आहे, एका कुटुंबाने चक्क मेथीची भाजी समजून गांजाची भाजी केली आणि खाल्ल्यावर अख्ख्या कुटुंबाला दवाखान्यात भरती करावे लागले.

या कुटुंबाला त्यांच्या गावातील एका तरुणाने मजाक मध्ये मेथीची भाजी म्हणून गांजा दिला होता, ह्या कुटुंबाला मात्र वेगळ्या प्रकारची मेथी बघून मोह आवरेना झाल्याने त्यांनी त्याची भाजी बनवून खाल्ली. ती प्राशन करताच कुटुंबातील सर्व लोक बेशुद्ध पडले. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी भाजीचे सँपल्स ताब्यात घेतले आहेत. भाजी म्हणून गांजा विकणाऱ्या नवल किशोर नावाच्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गंमत करणं एखाद्याला किती महागात पडू शकतं हे अनेकदा आपण पाहिलं आहे.अनेकदा छोटीशी गंमत अनेकांच्या जीवावर बेतल्याचंही आपण पाहिलं आहे. अशीच एका व्यक्तीने केलेली ही गंमत काही लोकांच्या जीवावर बेतली असती, अशीच ही घटना आहे.