
सध्या सोशल मीडियावर राजस्थान मधील रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांच्या भांडणाचा व्हिडीओ वणव्या सारखा व्हायरल होत आहे. आयएफएसचे अधिकारी परवीन कासवान यांच्या मते हे दोन्ही वाघ भावंडे आहेत. त्यातला एक वाघ टी५७ सिंघस्त तर दुसरा टी५८ रॉकी आहे. १६ ऑक्टोबर रोजी परवीन कासवान यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात एका वाघिणी साठी दोन वाघांमध्ये जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या मते हे दोघंही वाघ सख्खे भाऊ असून जयसिंघपुरा क्षेत्रातील शर्मिली नामक वाघिणीची ही मुलं आहेत. अर्थात दोन सख्खे भाऊ वाघिणीसाठी भांडत आहेत.
आयएफएस चे अधिकारी प्रविण कासवान यांनी ट्विट केलेला व्हिडीओ पुढील प्रमाणे…
एका रिपोर्ट नुसार आता पर्यंत २५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून यावर अनेक कमेंट्स ही आल्या आहेत. कासवान यांनी हेही सांगितलं की, या भांडणात टी ५७ सिंघस्थ वाघ जिंकला आणि यात दोन्ही वाघ सुखरूप असून कोणाला ही गंभीर दुखापत झाली नाही.