Home राष्ट्रीय दिल्लीत आंदोलकांचा पुन्हा हिंसाचार: पोलिसांवर बेछूट दगडफेक, पोलीस चौकी जाळली!

दिल्लीत आंदोलकांचा पुन्हा हिंसाचार: पोलिसांवर बेछूट दगडफेक, पोलीस चौकी जाळली!

0

नागरिकत्व सुधार कायद्याविरोधात दिल्लीवासी पुन्हा भडकले आहेत. मंगळवारी सिलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर बेछूट दगडफेक केली. परिणामी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तब्बल दोन तास दिल्लीचा तो भाग शांत करण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. मात्र तोवर लोकांनी दोन दुचाकी व पोलीस चौकीला पेटवून दिलं होतं.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंगळवारी दिल्लीतील आंदोलक अतिशय शांततेत मोर्चा काढत होते. मात्र अचानक काय झालं कुणास ठाऊक जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी देखील अश्रूधुराचा वापर करून जमाव पांगवला. पुढे ड्रोनद्वारे सर्वत्र पाहणी करून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं. मंगळवारी जमावाने दोन दुचाकी व पोलीस चौकी पेटवण्यानंतर वेळेचं गांभिर्य लक्षात घेता तात्काळ सात मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले.

केरळ मध्ये देखील आज अनेक बस जाळल्याची माहिती मिळत आहे.