Home राजकीय अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा दिवस उजाडला; दिल्लीत ७० जागांसाठी आज मतदान

अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा दिवस उजाडला; दिल्लीत ७० जागांसाठी आज मतदान

0

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अखेर आज दिनांक ८ फेब्रुवारीला पार पडत आहेत. संपूर्ण देशाचे तसेच राजकीय नेत्यांचे या निवडणुकीकडे लक्ष वेधले आहे. एकूण ६७२ उमेदवार विधानसभेच्या ७० जागांसाठी ही निवडणूक लढवणार आहेत. या मतदानाची मतमोजणी ११ फेब्रुवारीला होणार असल्याचे मीडिया न्यूजवरून समजले.

लोकमतच्या रिपोर्टनुसार या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी तसेच पक्षांनी अनेकदा चिखलफेक केली. तसेच पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या प्रचार योजनांचा अवलंब केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसने रोड शो सादर केले. भाजपच्या रोड शो मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व खासदार सनी देओल यांनी तसेच काँग्रेसच्या रोड शो साठी खासदार राज बब्बर यांनीही पदयात्रा केल्या. तर आम आदमी पार्टीने ‘झाडू चलाओ यात्रे’तून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, भाजपचे आशिष सूद, अलका लांबा असे अनेक महत्वाचे नेते ही निवडणूक लढवत असल्याने अनेकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.